Friday, February 10, 2017

Kokan , Mahabaleshwar Tour

रत्नागिरी जिल्हय़ात इतक्या मोठय़ा संख्येने नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत की या स्थळांना भेटी देणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.. तसं संपूर्ण कोंकणचा विचार केला तर सर्वाधिक 11 नैसर्गिक पर्यटनस्थळे दापोली तालुक्यातील आहेत म्हणुन मी दापोली तालुका फिरण्याचा निर्णय अचानक घेतला...
ठरल्याप्रमाणे एक मित्र घेऊन आधी मित्राला पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घडवलं , शनिवार वाडा दाखवून ऊसाचा रस पिऊन आत्मा तृप्त करत तसंच पुढे आयुष्यातल्या काही अविस्मरणीय अशी ठिकाणं जापनिज पार्क , सारसबाग , स्नेक पार्क मित्राला दाखवून सायंकाळी एक खास भेट आणि शुभेच्छा घेऊन पुण्यात चिंचवडच्या बॅचलर मित्रांकडे मुक्कामासाठी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दापोली कडे प्रयाण करण्याचा निर्णय घेतला पुण्यातले मित्र म्हणजे मुक्कामाचे हक्काचं ठिकाण आणि दर्यादिल मित्र दरवेळेस गेल्यावर आईस्क्रिम चा पाहुणचार केल्या शिवाय सोडत नाहीत....
सकाळी मित्रांचा निरोप घेत हिंजवडी लवासा ताम्हिणी मार्गे लवासाच्या जुन्या आठवणी जाग्या करत आम्ही निघालो हिंजवडी पर्यंत IT पार्क ची वर्दळ सोडल्यावर रस्त्याच्या बाजूची हिरवळ मन अगदी भरभरून निघत होते रस्त्यात मुळशी डॅम ला थांबून फोटो काढत पुढे घाट रस्ते पार करत माणगाव मार्गे दापोली कडे निघालो, दापोली पासून जवळच्या एका बीचवर रिसॉर्ट बुक केलं होतं ते शोधत जात असताना लांबसडक निळेशार समुद्रकिनारे, नारळी- पोफळीच्या बागा, सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा, खाडीकिनारे, बॅकवॉटर यांनी मंन अगदी प्रसन्न करून टाकले अगदी गाडी चालवून आलेला कंटाळा घालवून टाकला.. संध्याकाळी बीचवर आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी वर गप्पा मारत चंद्र चांदण्या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत तिथल्याच झोपाळ्यावर निवांत ताणून दिली...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून डॉल्फिन बघायला डॉल्फिन राईड करून थोडा वेळ समुद्रात लहान पोरांसारखी मस्ती करत वाळूत खेळून नाष्टा उरकुन हरणेबंदर मुरुड बीच ते कर्दे बीच च्या वाळूतून गाडी चालवत आम्ही कड्यावरच्या गणपतीला निघालो मध्ये घाटातूनजाताना उंचावरून दिसणारा समुद्र पाहिल्यावर तिथून निघावस वाटत नाही कड्यावरच्या गणपतीचा इतिहास लक्षात घेऊन जवळच्या सुवर्णदुर्ग वरून सूर्यास्त बघत आम्ही परत रिसॉर्टवर आलो...
तिसऱ्या दिवशी जवळ असलेल्या परशुरामांचे स्मारकाचे दर्शन घेऊन नारळाच्या बागामधून हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत थोडा वेळ शहरात घालवला तोपर्यंत मुंबईवरून येणारे आमचे पाहुणे दापोलीमध्ये येऊन पोचले होते त्यांना घेऊन रिसॉर्ट वर पोचलो त्यांची व्यवस्थित सोय झाल्यावर बीच पासून जवळच्याच एका दत्तगुरु मंदिरात गेलो; दत्तगुरु मंदिरापासून दिसणाारा समुद्र आणि समुद्रात होणारा सूर्यास्त आपल्याला तेथून हलू देत नाही बघता बघता 6 वाजले चहाप्यायला एका टपरीवर थांबलो असता त्यानेआम्ही इतक्या लांब baikवर आलोय म्हणून आश्चर्य मानलं कौतुक केलं आणि पुढच्याप्रवासाची विचारपूस केली आणि एक काळजीपूर्वक सल्ला दिला की कोकणात रात्री 10 नंतर प्रवास करू नका तो सल्ला आम्ही मानायचा ठरवलं आणि विचार केला की दापोली पासून परतीचा प्रवास करायचा तर ते अंतर जवळपास 240 किमी आणि संपूर्ण घाटरस्ता आणि रात्रीचा घाटप्रवास करायचा नाही अशी घरून पण तंबी होती मग अचानक परतीचा प्लॅन बदल करत दापोलीतून महाबळेश्वर 100 किमी असल्यामुळे महाबळेश्वर वरून सातारा गावाला जाण्याचा निर्णय घेतला कारण महाबळेश्वरच्या पुढे रात्री प्रवास करण्यासकाही हरकत नव्हती सायंकाळी 6 वा खेड रत्नागिरी पोलादपूर मार्गे निघालो तरीपण शेवटी रात्र हि झालीच आणि आम्हाला पुढे जाणे गरजेचेच होतं अंधाऱ्या रात्री घाटातून आमची गाडी निघाली रात्री खाली उतरणारे ढग, दाट अंधार गाडीच्या लाईट ने चिरत , थोडं थोडं अंतर कापत , रातकिड्यांची किरकिर ऐकत , थोडीफार मनात साठलेली भीती दाबत महाबळेश्वर मध्ये रात्री 10 वा. पोच झालो ; महाबळेश्वरच्या घाटातून खाली दिसणारी गावं म्हणजे जनु काय होळीतल्या विस्तवाच्या निखाऱ्या सारखे भासत होते ते दृश्य मनात साठवत रात्री 11:30 वाजता महाबळेश्वर मधून सज्जनगड आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या मध्ये डोंगराच्या पायथ्याशी ऐटीत वसलेल्या गावी मध्यरात्री मुक्कामी पोचलो सकाळी उठल्यावर विहिरीवर डोक्यावर सूर्य आल्यावर मनसोक्त अंघोळ आणि परत काही मित्रांची ची 2 दिवसाची सोय महाबळेश्वर मध्ये करून त्यांची भेट घेण्याच्या कारणास्तव महाबळेश्वर चा रस्ता धरला महाबळेश्वरमध्ये त्यांचीभेट घेऊन थोडा वेळ मॅप्रोगार्डन मध्ये घालवून वेण्णा लेक जवळथोडा वेळ घालवला. उंच पर्वतरांगा, त्यावरची दाट वृक्षराजी, पक्ष्यांचा किलबिलाट, खळखळणारे निर्झर, प्राचीन मंदिरे, गड-कोट, तलाव-सरोवराचे सान्निध्य, लाल मातीतल्या वाटा, कडय़ावर स्वार होणारे ते पॉइंट्स, धुक्याने भरून गेलेल्या दऱ्या , आणि भारावून टाकणारा पाचगणी टेबल लँडवरचा सूर्यास्त असे हे महाबळेश्वरचे गारुडच प्रत्येक पावलाला आलेल्या त्या आठवणी हृदयात सामावून घेत पुण्याचा रस्ता धरला पुण्याला येत असताना गाडीच्या मागच्या चाकाचा डिस्क गरम झाला त्यामुळ ब्रेक लागायचा बंद झाला थोडी काळजी घेत पुणे पोच झालो आणि या 4 दिवसात जगलेलं आयुष्याचं गाठोडं डोक्यावर घेत परत मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात पोच झालो....
#KonkanDiaries2017
#Traveller
#AHN👣