Monday, March 19, 2018

bag packing

पॅकिंग कसं कराल याची एक यादी देत आहे. ही यादी मी डायरीत करून ठेवली आहे. ती बघून मी पॅकिंग करतो. अक्षरशः १५ मिनिटांत पॅकिंग होतं. ही मी साधारण आठवड्याचा प्रवास आहे असं धरून केलेली यादी आहे.

A) कपडे – २-३ जीन्स आणि ८-९ कुडते किंवा टीशर्ट किंवा टॉप्स (एखादा दुसरा नेहमी जास्त असावा) पुरूषांना २-३ जीन्स आणि ८-९ टीशर्ट किंवा शर्ट्स

B) आतले कपडे – ७ सेट्स (म्हणजे धुवावे लागणार नाहीत) काही कुडत्यांना स्लीप वापरत असाल तर त्याही आठवणीनं घ्या. ७-८ रूमाल

C) थंड प्रदेशात जात असाल तर – वॉर्मर्स, स्वेटर, जॅकेट, मोजे, टोपी, हातमोजे

D) समुद्रावर जात असाल तर – स्लीपर, पोहणं येत असेल तर स्विमिंग कॉश्चूम

E) टॉयलेटरी – टूशपेस्ट, टूथब्रश, छोटी शँपूची बाटली किंवा सॅशे, माउथवॉशची लहान बाटली, व्हॅसलिन, मॉइश्चरायझरची लहान बाटली, डिओडरंट, बॉडी वॉशची लहान बाटली, फेसवॉश वापरत असाल तर ती लहान बाटली, सनस्क्रीन लोशन, कंगवा, लिपस्टिक वापरत असाल तर तीही (हे सगळं एका पाउचमध्ये घ्या)

F) चार्जर्स – मोबाइल, आयपॅड किंवा टॅब, आयपॉड (यांचे चार्जर्स), लॅपटॉप घेणार असाल तर त्याचा चार्जर लॅपटॉप बॅगमध्येच असतो. हल्ली मोबाइलमुळे कॅमेरा फार कुणी नेत नाही. पण नेत असाल तर त्याचा चार्जर, युनिव्हर्सल सॉकेट किंवा एडाप्टर (या चार्जरचं दुसरं वेगळं पाउच करा.)

G) औषधं – रोज काही औषधं घेत असाल तर ती औषधं. शिवाय जिथे जात असाल तिथे दुकानं सहज मिळण्याची शक्यता नसेल तर क्रोसिन, पोटासाठीचं एखादं औषध, एसिडिटीसाठीचं औषध, उलटीसाठीचं औषध, एखादं अँटीअलर्जिक, एखादं अँटिबायोटिक (डॉक्टरांना विचारून घ्या), विक्स, नोजल ड्रॉप्स, एखादं अँटिबायोटिक ऑइंटमेंट ही ढोबळ औषधं. लागणा-या औषधांचं आपल्या डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घ्या. (याचं एक पाउच करा)

H) फुटवेअर – प्रवासात नेहमी वॉकिंग शूज वापरावेत. पण एक चपलेचा जोड बरोबर ठेवावा. काही ठिकाणी उदाहरणार्थ धार्मिक स्थळांमध्ये जाताना चपला वापरणं जास्त सोपं होतं. शिवाय हॉटेलमध्ये उतरला असाल तर तिथल्यातिथे फिरायला बरं पडतं. शूज वापरणार असाल तर मग मोज्यांचे तीन जोड.

I) पर्स – प्रवासासाठीची पर्स नेहमी थोड्या मोठ्या आकाराची घ्या. शिवाय ती वॉटरप्रूफ असावी. त्यात नेहमी लागतील इतपत पैसे, क्रेडीट आणि डेबिट कार्ड, कंगवा, रूमाल, नॉशिया येत असेल तर ती गोळी, चघळता येतील अशा गोळ्या, वाचायला एखादं पुस्तक, गॉगल्स, चष्मा असेल तर ते कव्हर, एखादं रबरबँड किंवा केस बांधण्याचा चिमटा, गाणी ऐकायला इयरफोन्स, हँड सॅनिटायझर, पेन

J) बॅगेजमध्ये – एखादं स्वेटर किंवा शाल पुस्तकांशिवाय माझा प्रवास होत नाही त्यामुळे २-३ पुस्तकं, एखादी लहानशी डायरी, काही कानात-गळ्यात घालणार असाल तर त्याचं पाउच.
मुलं आणि मित्रमंडळींबरोबरही पत्ते खेळायला मजा येते. त्यामुळे पत्त्यांचे दोन जोड ठेवाच.

ही यादी समोर ठेवलीत आणि पॅकिंग केलंत तर अक्षरशः १५ मिनिटांत पॅकिंग होतं. यादी मोठी असली तरी सामान फार होत नाही! आणि शेवटी प्रवास हा आनंदासाठी करतोय हे लक्षात ठेवा. काही लोकांना लहानसहान गोष्टीवरून कुरकर करायची सवय असते. प्रवासात थोडं वरखाली होणार हे गृहीत घरून चाला. कधी ट्रेन लेट होते तर कधी विमानाला उशीर होतो, कधी खाणंपिणं मनासारखं मिळत नाही. पण या गोष्टी लहान आहेत. आपल्या घरच्यांबरोबर, मित्रमंडळींबरोबर आपण प्रवास करतो तेव्हा खूप मजा येते. सगळेजण रोजचे ताण विसरलेले असतात, एकमेकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे प्रवासाची मजा घ्या आणि इतरांनाही घेऊ द्या.

ट्रेन मध्ये एखादी शाल वैगेरे घ्यावी जेणेकरून ट्रेन मध्ये थंडी वाजू नये..

थोडक्यात महत्त्वाचे

- प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन आवश्यक.
- कायमस्वरूपी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा व डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोबत जरुरीचे.
- अतिसार, ताप, उलट्या, अंगदुखी, अॅलर्जी, सदी-खोकला यावरील औषधे आवश्यक.
- डास, इतर कीटकदंश यासाठीच्या उपाययोजना.
- नेहमीचे डॉक्टर, फार्मासिस्ट यांचे फोन नंबर सोबत जरुरीचे.
- विशिष्ट आजार व काही औषधांची अॅलर्जी यांची नोंद ओळखपत्रावर असावी.
- औषधे डब्यात, पाऊचमध्ये ठेवावीत व सोबत औषधाचे नाव व उपयोग याची यादी ठेवावी.
- कृपया मौल्यवान सोन्या चांदीच्या वस्तू आणू नयेत.
- स्वतःजवळ आपले आयडेंटिटी कार्ड ठेवणे उदा. आधार कार्ड , पॅन कार्ड

काही शंका असल्यास निर्धास्त पणे संपर्क अवधुत टूर्स - भटकंतीची परिपूर्णता - 09664286300 / 8390922322

No comments:

Post a Comment